स्पर्धेची प्रस्तावना
विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणार्या “अंकनाद - गणिताची सात्मीकरण प्रणाली” तर्फे सादर करत आहोत, राज्यव्यापी पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा. आतापर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर online पद्धतीने ही स्पर्धा (मागील ३ पर्व) आयोजिली जात होती. राज्यात सर्व शाळा सुव्यवस्थितपणे सुरु झाल्याने ही स्पर्धा online आणि offline (शाळा पातळीवर) दोन्ही पद्धतीने शाळा / जिल्हा आणि राज्य पातळीवर आयोजित करण्यात येणार असून ती सर्वांसाठी खुली आहे. online स्पर्धांसाठी नेहमीप्रमाणे ६ गट असतील. offline (शाळा पातळीवर) स्पर्धांसाठी ५ गट असतील. खुल्या गटातील स्पर्धकांनी online स्पर्धेतच सहभागी व्हायचे आहे. सहभागी होण्यासाठी अंकनाद अॅप्लिकेशन मधील लिंकवरील फॉर्म भरुन आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेची नियमावली पूर्ण वाचून त्याचे पालन करणे गरजेचे आहे.
नोंदणीसाठी महत्वाची माहिती
- नियमावली मान्य असल्याचे बटन क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म उघडला जाईल.
- सर्वप्रथम गट निवडून गटानुसार आवश्यक ती माहिती काळजीपूर्वक भरावी.
- नोंदणी सुरळीत आणि विनाविलंब पार पडावी यासाठी आपले ओळखपत्र, आधारकार्ड जवळ असू द्या.
- पुढील communication सुलभव्हावे म्हणून मोबाइल नंबरच्या ठिकाणी WhatsAppचा नंबर नोंदवावा.
- स्पर्धेच्या नोंदणीचा फॉर्म काळजीपूर्वक भरावा, स्पर्धकाचे नाव मराठीतून लिहावे, हेच नाव प्रशस्तिपत्रावर येणार आहे. (व्हिडिओ अपलोड केलेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्र दिले जाणार आहे.)
- नोंदणी झाल्यानंतर आपल्याला मेल द्वारे आपला नोंदणी क्रमांक कळवला जाईल, तो जपून ठेवावा, त्याचा वापर करूनच व्हिडिओ अपलोड करता येणार आहे.
उद्दिष्ट्ये
लयबद्ध पाढे
म्हणता येणे
स्पर्धात्मक वृत्ती,
सभाधीटपणा जोपासणे
मुलांच्या मेंदूचा
गणिती विकास घडवणे
स्मरणशक्तीचा विकास,
स्पष्ट शब्दोच्चार
जाणून घ्या बक्षिसांचे स्वरूप
व्हिडिओ अपलोड करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास प्रशस्तिपत्र
राज्य पातळीचे विजेते प्रत्येक गटांमधून निवडले जातील
राज्य पातळी पहिले बक्षीस
₹११०००/- मूल्याचे एनएससी सर्टिफिकेट
राज्य पातळी द्वितीय बक्षीस
₹७०००/- मूल्याचे एनएससी सर्टिफिकेट
राज्य पातळी तृतीय बक्षीस
₹५०००/- मूल्याचे एनएससी सर्टिफिकेट
स्पर्धेचे प्रारूप
भाग १
जिल्हा / शाळा पातळी
भाग २
राज्य पातळी
स्पर्धेची नियमावली
1. ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी आहे.
2. नोंदणी करण्यापूर्वी ऑनलाईन आणि ऑफलाईन स्पर्धेचे नियम काळजीपूर्वक वाचावे आणि त्यांचे पालन करावे.
3. ऑनलाईन स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी जिल्हा पातळीसाठी दिलेल्या गटानुसार पाढा म्हणतानाचा व्हिडीओ अपलोड
करावा.
4. ऑफलाईन शाळा पातळीवर स्पर्धकांनी दिलेल्या गटानुसार पाढे म्हणणे गरजेचे आहे.
5. या स्पर्धेसाठी पाढे मराठी भाषेतूनच म्हणायचे आहेत. अन्य भाषेतील पाढे ग्राहय धरले जाणार नाही.
6. स्पर्धा विश्वसनीय होण्यासाठी स्पर्धक आणि पालकांनी कृपया कोणत्याही गैरमार्गाचा वापर होणार नाही याची संपूर्ण
दक्षता घ्यावी. तसे आढळल्यास नाईलाजास्तव तो स्पर्धक बाद केला जाईल.
7. आठवी, नववी, दहावी, खुला गट आणि शासकीय कर्मचारी गटातील स्पर्धकांनी आपल्या अभ्यासक्रमातील किमान तीन
पाढे संपूर्ण (१ ते १००) म्हणणे आवश्यक आहे. अन्यथा तुमची एन्ट्री बाद ठरवली जाईल.
8. आमच्याकडे जमा झालेल्या व्हिडीओंचे गणित शिक्षकांच्या माध्यमातून परीक्षण होऊन त्यातून काही स्पर्धक
राज्यस्तरासाठी निवडले जातील.
9. राज्यस्तरीय तोंडी परीक्षेत अभासक्रमात असलेले आणि आपल्या गटापर्यंतचे सर्व पाढे येणे गरजेचे आहे. (उदा. – पहिली
पासूनचे सर्व पाढे आले पाहिजे.)
10. महत्वाची सूचना – मागील स्पर्धेतील विजेत्याला त्याच गटात पुन्हा सहभागी होता येणार नाही. त्यांना पुढच्या
गटातून सहभाग घेण्याची मुभा आहे. मात्र खुल्या गटातील विजेत्यांना पुन्हा स्पर्धेत सहभागी होता येणार
नाही.
व्हिडीओ बाबत महत्त्वाच्या सूचना :
- व्हिडिओ मध्ये विद्यार्थी व्यवस्थित दिसला पाहिजे.
- विद्यार्थ्याची नजर कॅमेर्याकडे असावी.
- व्हिडीओ मधील ध्वनी स्पष्ट असावा आणि ओठांची हालचाल व शब्द उच्चार यामधील तफावत दिसू नये.
- प्रत्येक स्पर्धकाने एकच व्हिडिओ अपलोड करायचा आहे.
- व्हिडीओ तयार करताना लयबद्ध पाढे म्हणणे अपेक्षित आहे.
अपूर्णांकाचे पाढे १०० पर्यंत म्हणायचे आहेत अन्यथा तुमची एन्ट्री बाद ठरवली जाईल
आमची खात्री आहे की वरील सूचना आपण काळजीपूर्वक वाचल्या आहेत, या बाबत शंका असल्यास खालील मोबाइल नंबर वर संपर्क साधावा. वरील नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, आम्हाला काही संशयास्पद आढळल्यास अंतिम निर्णय आयोजकांचा राहतील.
कोरोना काळात निर्माण झालेल्या कंटाळवाण्या वातावरणातून मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी, त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी टॉनिक ठरेल अशीआगळीवेगळी स्पर्धा.