Online (वैयक्तिक स्पर्धा नियमावली)
MAAP EPIC Communication Pvt. Ltd. आणि राज्य मराठी विकास संस्था,
महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
“लोकमान्य टिळक अंकनाद पाढे सात्मीकरण स्पर्धा पर्व-४”
स्पर्धेची प्रस्तावना
विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणार्या “अंकनाद – गणिताची सात्मीकरण प्रणाली” तर्फे सादर करत आहोत, राज्यव्यापी पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा. राज्यात सर्वत्र शाळा सुव्यवस्थितपणे सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे online आणि offline दोन्ही पद्धतीने ही स्पर्धा शाळा / जिल्हा आणि राज्य पातळीवर आयोजित करण्यात येणार असून ती सर्वांसाठी खुली आहे. online स्पर्धांसाठी नेहमीप्रमाणे ६ गट असतील. सहभागी होण्यासाठी अंकनाद अॅप्लिकेशन मधील लिंकवरील फॉर्म भरुन आपल्या नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेची नियमावली पूर्ण वाचून त्याचे पालन करणे आवश्यक आहे.
स्पर्धेसाठी गटानुसार अभ्यासक्रम
गट | इयत्ता | पाढे |
१ | बालगट आणि पहिली | १ ते १०० अंक उच्चार |
२ | दुसरी आणि तिसरी | दुसरी – १ ते १० आणि ११ ते २० पाढे
तिसरी – १ ते १०, ११ ते २० पाढे आणि २१ ते ३० पाढे |
३ | चौथी आणि पाचवी | पावकी आणि निमकी (दोन्ही पाढे १०० पर्यंत म्हणावे) |
४ | सहावी आणि सातवी | पाऊणकी आणि सव्वायकी (दोन्ही पाढे १०० पर्यंत म्हणावे) |
५ | आठवी, नववी आणि दहावी | दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रे (किमान तीन पाढे १०० पर्यंत म्हणावे) |
६ | खुला गट आणि शासकीय कर्मचारी गट | पाऊणकी, सव्वायकी, दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रे (किमान तीन पाढे १०० पर्यंत म्हणावे) |
महत्वाची सूचना – मागील स्पर्धेतील विजेत्याला त्याच गटात सहभागी होता येणार नाही. त्यांना पुढच्या गटातून सहभाग घेण्याची मुभा आहे. मात्र खुल्या गटातील विजेत्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
स्पर्धेची नियमावली
-
- ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी आहे.
- जिल्हा पातळीवर स्पर्धकांचा दिलेल्या गटानुसार पाढा म्हणतानाचा व्हिडीओ अपलोड करावा.
- या स्पर्धेसाठी पाढे मराठी भाषेतूनच म्हणायचे आहेत. अन्य भाषेतील पाढे ग्राहय धरले जाणार नाही.
- स्पर्धा विश्वसनीय होण्यासाठी स्पर्धक आणि पालकांनी कृपया कोणत्याही गैरमार्गाचा वापर होणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी. तसे आढळल्यास नाईलाजास्तव तो स्पर्धक बाद केला जाईल.
- आठवी, नववी, दहावी, खुला गट आणि शासकीय कर्मचारी गटातील स्पर्धकांनी आपल्या अभ्यासक्रमातील किमान तीन पाढे संपूर्ण (१ ते १००) म्हणणे आवश्यक आहे. अन्यथा तुमची एन्ट्री बाद ठरवली जाईल.
- आमच्याकडे जमा झालेल्या व्हिडीओंचे गणित शिक्षकांच्या माध्यमातून परीक्षण होऊन त्यातून काही स्पर्धक राज्यस्तरासाठी निवडले जातील.
- राज्यस्तरीय तोंडी परीक्षेत अभासक्रमात असलेले आणि आपल्या गटाच्या खालच्या गटातील सर्व पाढे येणे गरजेचे आहे.
व्हिडीओ बाबत महत्त्वाच्या सूचना :
- व्हिडिओ मध्ये विद्यार्थी व्यवस्थित दिसला पाहिजे.
- विद्यार्थ्याची नजर कॅमेर्याकडे असावी.
- व्हिडीओ मधील ध्वनी स्पष्ट असावा आणि ओठांची हालचाल व शब्द उच्चार यामधील तफावत दिसू नये.
- प्रत्येक स्पर्धकाने एकच व्हिडिओ अपलोड करायचा आहे.
- व्हिडीओ तयार करताना लयबद्ध पाढे म्हणणे अपेक्षित आहे.
नोंदणीसाठी विषयक सूचना
- नियमावली मान्य असल्याचे बटन क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म उघडला जाईल.
- सर्वप्रथम गट निवडून गटानुसार आवश्यक ती माहिती काळजीपूर्वक भरावी.
- नोंदणी सुरळीत आणि विनाविलंब पार पडावी यासाठी आपले ओळखपत्र, आधारकार्ड जवळ असू द्या.
- पुढील communication सुलभ व्हावे म्हणून मोबाइल नंबरच्या ठिकाणी WhatsApp चा नंबर नोंदवावा.
- स्पर्धेच्या नोंदणीचा फॉर्म काळजीपूर्वक भरावा, स्पर्धकाचे नाव मराठीतून लिहावे, हेच नाव प्रशस्तिपत्रावर येणार आहे. (व्हिडिओ अपलोड केलेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्र दिले जाणार आहे.)
- नोंदणी झाल्यानंतर आपल्याला मेल द्वारे आपला नोंदणी क्रमांक कळवला जाईल, तो जपून ठेवावा, त्याचा वापर करूनच व्हिडिओ अपलोड करता येणार आहे.
आमची खात्री आहे की वरील सूचना आपण काळजीपूर्वक वाचल्या आहेत, या बाबत शंका असल्यास खालील मोबाइल नंबर वर संपर्क साधावा. वरील नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, काही संशयास्पद आढळल्यास अंतिम निर्णय आयोजकांचा राहील.
अधिक जानकारी के लिए संपर्क करें।
8767886606 / 7276684072 / 9860441619
Email – info@aanknaad.com