Offline (शाळा पातळीवर सहभागाची नियमावली)
MAAP EPIC Communication Pvt. Ltd. आणि राज्य मराठी विकास संस्था,
महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
“लोकमान्य टिळक अंकनाद पाढे सात्मीकरण स्पर्धा पर्व-४”
स्पर्धेची प्रस्तावना
विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणार्या “अंकनाद – गणिताची सात्मीकरण प्रणाली” तर्फे सादर करत आहोत, राज्यव्यापी पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा. राज्यात सर्वत्र शाळा सुव्यवस्थितपणे सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे online आणि offline दोन्ही पद्धतीने ही स्पर्धा शाळा / जिल्हा आणि राज्य पातळीवर आयोजित करण्यात येणार असून ती सर्वांसाठी खुली आहे. offline स्पर्धांसाठी ५ गट असतील. सहभागी होण्यासाठी अंकनाद अॅप्लिकेशन मधील लिंकवरील फॉर्म भरुन आपल्या नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेची नियमावली पूर्ण वाचून त्याचे पालन करणे आवश्यक आहे.
स्पर्धेसाठी गटानुसार अभ्यासक्रम
गट | इयत्ता | पाढे |
१ | बालगट आणि पहिली | १ ते १०० अंक उच्चार |
२ | दुसरी आणि तिसरी | दुसरी – १ ते १० आणि ११ ते २० पाढे
तिसरी – १ ते १०, ११ ते २० पाढे आणि २१ ते ३० पाढे |
३ | चौथी आणि पाचवी | पावकी आणि निमकी (दोन्ही पाढे १०० पर्यंत म्हणावे) |
४ | सहावी आणि सातवी | पाऊणकी आणि सव्वायकी (दोन्ही पाढे १०० पर्यंत म्हणावे) |
५ | आठवी, नववी आणि दहावी | दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रे (किमान तीन पाढे १०० पर्यंत म्हणावे) |
महत्वाची सूचना – मागील स्पर्धेतील विजेत्याला त्याच गटात सहभागी होता येणार नाही. त्यांना पुढच्या गटातून सहभाग घेण्याची मुभा आहे. मात्र खुल्या गटातील विजेत्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
स्पर्धेची नियमावली
- ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विद्यार्थी आहे.
- शाळा पातळीवर स्पर्धकांनी दिलेल्या गटानुसार पाढे म्हणणे गरजेचे आहे.
- या स्पर्धेसाठी पाढे मराठी भाषेतूनच म्हणायचे आहेत. अन्य भाषेतील पाढे ग्राहय धरले जाणार नाही.
- स्पर्धा विश्वसनीय होण्यासाठी स्पर्धक आणि शिक्षकांनी कृपया कोणत्याही गैरमार्गाचा वापर होणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी. तसे आढळल्यास नाईलाजास्तव तो स्पर्धक बाद केला जाईल.
- आठवी, नववी, दहावी, गटातील स्पर्धकांनी आपल्या अभ्यासक्रमातील किमान तीन पाढे संपूर्ण (१ ते १००) म्हणणे आवश्यक आहे. अन्यथा तुमची एन्ट्री बाद ठरवली जाईल.
- राज्यस्तरीय तोंडी परीक्षेत अभासक्रमात असलेले आणि आपल्या गटाच्या खालच्या गटातील सर्व पाढे येणे गरजेचे आहे.
offline स्पर्धेबाबत महत्त्वाच्या सूचना :
- एका गटातून किमान २० मुले आणि शाळेतून किमान ६० मुले सहभागी होणे आवश्यक आहे आणि प्रत्येक स्पर्धकाची AANKNAAD APP च्या माध्यमातून स्वतंत्रपणे नोंदणी करणे गरजेचे आहे.
- गटशः स्पर्धकांची नावे आणि त्यांचे Unique Code आम्हाला info@aanknaad.com या मेल आयडीवर पाठवणे गरजेचे आहे. ज्या शाळांच्या याद्या आमच्याकडे जमा होतील त्याच स्पर्धकांचा सहभाग ग्राह्य धरला जाईल.
- १ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट मधील काळात आपल्याच शाळेत offline स्पर्धा घेण्यासाठीची तारीख निश्चीत करावी आणि ही तारीख आम्हाला कळवावी.
- offline स्पर्धेचे परीक्षण शाळेतील शिक्षकांनीच करावे. मुलांच्या याद्यांसोबत परीक्षकांची नावे पण कळवणे गरजेचे आहे. आमच्या राज्यस्तरीय प्रशिक्षकांच्या माध्यमातून या परीक्षकांचे प्रशिक्षण घेतले जाईल.
- offline स्पर्धेचे परीक्षण केल्याबद्दल online प्रमाणपत्र दिले जाईल
- प्रत्येक स्पर्धकाने गटानुसार लयबद्ध आणि संपूर्ण पाढे म्हणणे गरजेचे आहे.
- offline स्पर्धेत प्रत्येक गटातून ४ विजेते निवडावे. जे शाळा स्तरावरील विजेते असतील ते स्पर्धक थेट राज्य पातळीवर निवडले जातील आणि त्यांचे पुढील परीक्षण zoom meeting च्या माध्यमातून केले जाईल. त्या संबधीच्या सूचना नंतर सविस्तरपणे पाठविल्या जातील.
- शाळा पातळीवरील विजेत्यांना राज्यस्तरीय निवड झाल्याची online प्रमाणपत्रे आणि आकर्षक बक्षीसं दिली जातील.
नोंदणीसाठी विषयक सूचना
- नियमावली मान्य असल्याचे बटन क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म उघडला जाईल.
- सर्वप्रथम गट निवडून गटानुसार आवश्यक ती माहिती काळजीपूर्वक भरावी.
- नोंदणी सुरळीत आणि विनाविलंब पार पडावी यासाठी आपले ओळखपत्र, आधारकार्ड जवळ असू द्या.
- पुढील communication सुलभ व्हावे म्हणून मोबाइल नंबरच्या ठिकाणी WhatsApp चा नंबर नोंदवावा.
- स्पर्धेच्या नोंदणीचा फॉर्म काळजीपूर्वक भरावा, स्पर्धकाचे नाव मराठीतून लिहावे, हेच नाव प्रशस्तिपत्रावर येणार आहे. (सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रशस्तिपत्र दिले जाणार आहे.)
- नोंदणी झाल्यानंतर आपल्याला मेल द्वारे आपला नोंदणी क्रमांक कळवला जाईल, तो जपून ठेवावा, त्याचा वापर संपूर्ण स्पर्धा काळात होणार आहे.
आमची खात्री आहे की वरील सूचना आपण काळजीपूर्वक वाचल्या आहेत, या बाबत शंका असल्यास खालील मोबाइल नंबर वर संपर्क साधावा. वरील नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, काही संशयास्पद आढळल्यास अंतिम निर्णय आयोजकांचा राहील.
अधिक जानकारी के लिए संपर्क करें।
8767886606 / 7276684072 / 9860441619
Email – info@aanknaad.com