MAAP EPIC Communication Pvt. Ltd. आणि राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र शासन

यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा पर्व

स्पर्धेची प्रस्तावना

मुलांमध्ये गणिताची गोडी निर्माण व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणार्‍या अंकनाद अ‍ॅप तर्फे सादर करत आहोत राज्यव्यापी पाढे पाठांतर स्पर्धा. ही स्पर्धा जिल्हा व राज्य पातळीवर आयोजित करण्यात आली असून ती सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी सात वयोगट असतील. सहभागी होण्यासाठी अंकनाद अॅप्लिकेशन मधील लिंकवरील फॉर्म भरुन आपल्या जिल्ह्यासाठी नोंदणी करून स्पर्धकाचा पाढे म्हणण्याचा व्हिडिओ अपलोड करणे आवश्यक आहे. व्हिडिओ कसा तयार करावा? स्पर्धेची नियमावली पूर्ण वाचून त्याचे पालन करणे आवश्यक आहे.

स्पर्धेसाठी गटानुसार अभ्यासक्रम

गट

इयत्ता

पाढे

Jr. Sr. KG आणि 1st

ते १०० अंक उच्चार

2nd आणि 3rd

2nd ते १० आणि ११ ते २० पाढे

3rd ते १०, ११ ते २० पाढे आणि २१ ते ३० पाढे

4th आणि 5th

पावकी आणि निमकी (दोन्ही पाढे १०० पर्यंत म्हणावे)

6th आणि 7th

पाऊणकी आणि सव्वायकी (दोन्ही पाढे १०० पर्यंत म्हणावे)

8th, 9th आणि 10th

दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रे (किमान तीन पाढे १०० पर्यंत म्हणावे)

खुला गट

पाऊणकी, सव्वायकी, दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रे (किमान तीन पाढे १०० पर्यंत म्हणावे)

शासकीय कर्मचारी गट

पाऊणकी, सव्वायकी, दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रे (किमान तीन पाढे १०० पर्यंत म्हणावे)

स्पर्धेची नियमावली

  • ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी आहे.
  • जिल्हा पातळीवर स्पर्धकांचा दिलेल्या गटानुसार पाढा म्हणतानाचा व्हिडीओ अपलोड करावा.
  • या स्पर्धेसाठी पाढे मराठी भाषेतूनच म्हणायचे आहेत. अन्य भाषेतील पाढे ग्राहय धरले जाणार नाही.
  • स्पर्धा विश्वसनीय होण्यासाठी स्पर्धक आणि पालकांनी कृपया कोणत्याही गैरमार्गाचा वापर होणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी. तसे आढळल्यास नाईलाजास्तव तो स्पर्धक बाद केला जाईल.
  • 8th, 9th, 10th, खुला गट आणि शासकीय कर्मचारी गटातील स्पर्धकांनी आपल्या अभ्यासक्रमातील किमान तीन  पाढे संपूर्ण ( ते १००) म्हणणे आवश्यक आहे. अन्यथा तुमची एन्ट्री बाद ठरवली जाईल. 
  • राज्यस्तरीय तोंडी परीक्षेत अभासक्रमात असलेले सर्व पाढे पाठ असणे गरजेचे आहे. 

व्हिडीओ बाबत महत्त्वाच्या सूचना :

  • व्हिडिओ मध्ये विद्यार्थी व्यवस्थित दिसला पाहिजे.
  • विद्यार्थ्याची नजर कॅमेर्‍याकडे असावी.
  • व्हिडीओ मधील ध्वनी स्पष्ट असावा आणि ओठांची हालचाल व शब्द उच्चार यामधील तफावत दिसू नये.
  • प्रत्येक स्पर्धकाने एकच व्हिडिओ अपलोड करायचा आहे.
  • व्हिडीओ तयार करताना लयबद्ध पाढे म्हणणे अपेक्षित आहे.

नोंदणीसाठी विषयक सूचना

  • नियमावली मान्य असल्याचे बटन क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म उघडला जाईल.
  • सर्वप्रथम गट निवडून गटानुसार आवश्यक ती माहिती काळजीपूर्वक भरावी. 
  • नोंदणी सुरळीत आणि विनाविलंब पार पडावी यासाठी आपले ओळखपत्र, आधारकार्ड जवळ असू द्या.
  • पुढील communication सुलभ व्हावे म्हणून मोबाइल नंबरच्या ठिकाणी WhatsApp चा नंबर नोंदवावा. 
  • स्पर्धेच्या नोंदणीचा फॉर्म काळजीपूर्वक भरावा, स्पर्धकाचे नाव मराठीतून लिहावे, हेच नाव प्रशस्तिपत्रावर येणार आहे. (व्हिडिओ अपलोड केलेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्र दिले जाणार आहे.)
  • नोंदणी झाल्यानंतर आपल्याला मेल द्वारे आपला नोंदणी क्रमांक कळवला जाईल, तो जपून ठेवावा, त्याचा वापर करूनच व्हिडिओ अपलोड करता येणार आहे.

आमची खात्री आहे की वरील सूचना आपण काळजीपूर्वक वाचल्या आहेत, या बाबत शंका असल्यास खालील मोबाइल नंबर वर संपर्क साधावा. वरील नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, आम्हाला काही संशयास्पद आढळल्यास अंतिम निर्णय आयोजकांचा राहतील.

अधिक माहितीसाठी खालील मोबाईल नंबर किंवा मेल वर संपर्क करा.

8767886606 / 8766782346 / 9511709047

Email – info@aanknaad.com